जिवंत काडतूस व गावठी पिस्तूल जप्त, स्कार्पिओ कार सह तरुणाला अटक
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ शहरात एका तरुणाला गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि स्कार्पिओ कारसह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार भुसावळ शहरातील नॉर्थ रेल्वे कॉलनी भागामध्ये सुभेदार रामजी आंबेडकर शाळेजवळ सुमित मनोहर पवार हा त्याच्या ताब्यातील स्कॉर्पिओ कार (एमएच १९ सीवाय ३९७८) यामध्ये गावठी पिस्तूलसोबत एक जिवंत काडतूस घेऊन फिरत असताना दिसला. त्याच्याकडून ६ लाख ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संदर्भात भुसावळ शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हेड कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संदीप चव्हाण, संघपाल तायडे, प्रवीण भालेराव, सचिन पोळ आदींनी केली आहे.

