क्राईमरावेर

पाल येथे नदीपात्रात २५ वर्षीय तरुणाचा सदस्यास्पद मृत्यू

पाल, ता . रावेर. मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी विनोद जाधव | रावेर तालुक्यातील पाल येथे वन प्रेक्षण केंद्राखाली सुकी नदी पात्रात वनपरिक्षेत्र हद्दीतील नदीपात्रात आज बुधवार रोजी दिनांक २६ मार्च २०२५ रोजी सुरेश सुमा रिया बारेला. वय २५ वर्ष. याचा दुपारी बारा वाजेच्या सुमारास संशयास्पद मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मृत्यू कसा झाला या बाबत कोणतीही माहिती अद्याप बाहेर आलेली नसून या बाबत संशय व्यक्त केला जात आहे.

पाल येथील सुखी नदी पात्रात वनपरिक्षेत्र हद्दीतील नदीपात्रात आज रोजी दिनांक २६ मार्च २०२५ रोजी सुरेश सुमा रिया बारेला. वय २५ वर्ष. याचा दुपारी बारा वाजेच्या सुमारास नदीपत्रात मृतदेह आढळला.

मयत सुरेश बारेला हा कलोरी तालुका जिल्हा खंडवा मध्य प्रदेश हल्ली मुक्काम दापोरे पोस्ट रवंजा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून तो मंगळवारी पाल येथील बाजारासाठी आलेला होता तसेच त्याची बहीण पाल येथील बैल पडावा येथे नामे पार्वतीबाई जाड्या बारेला हीस भेटण्यासाठी थांबणार होता. परंतु तो  सुकी नदी पात्रात संशयास्पद मयत स्थितीत मिळून आला. त्याचा मृत्यू कसा झाला. घातपात तर नव्हे? या बाबत संशय व्यक्त केला जात असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

या बाबत रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर भाग फैजपूर कृष्णात पिंगळे. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी भेट दिली. घटनास्थळी फॉरेस्ट टीम डॉटस्कॉट अंगुली मुद्रा पथक यांना पाचारण करण्यात आले.

सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर भाग कृष्णात पिंगळे. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार सुधाकर पाटील हे तपास करीत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!