भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

धक्कादायक : रावेर तालुक्यातील बाप – लेकीचा विजेचा शॉक लागून मृत्यू

तासखेडा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील तासखेडा येथे मुलीला विजेच्या तारांचा स्पर्श होऊन शॉक लागताच तिला वाचविण्यासाठी गेलेल्या बापालाही विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे पाच ते पावणे सहा वाजेच्या दरम्यान रावेर तालुक्यातील तापी काठ असलेल्या तासखेडा या गावी घडली.

मिळालेली माहिती अशी की, आज दिनांक १३ जून शुक्रवार रोजी सकाळी पाच ते पावणे सहा वाजेच्या दरम्यान रावेर तालुक्यातील तासखेडा येथील येथिल समाधान तायडे वय 36 वर्ष व मुलगी मानवी समाधान तायडे वय 9 वर्ष दोघांचा विजेचा शॉक लागून मुत्यू झाला .

उघड्या जिवंत विजेच्या ताराला मुलगी मानवी चा स्पर्श होताच मुलीला वाचविण्यासाठी वडील समाधान तायडे हे धाऊन गेले असता त्या दोघा बाप लेकीन विजेचा जबर शॉक लागून बाप लेकीचा त्यात मुत्य झाला. दोघांना भुसावळ येथे ट्रामा केयर सेंटर ला दाखल करण्यात आले आहे.

समाधान तायडे हा केळी व्यवसाय करून आपला उदर निर्वाह करत होता गावात सर्वा सोबत मनमिळावू असल्याने गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!