भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमधुळे

शाळेतच स्वीकारली लाच : मुख्याध्यापिकेला अटक, शिक्षण क्षेत्रात खळबळ

धुळे,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात शिक्षण क्षेत्रातही लाचेची प्रमाण वाढताना दिसून येत असून मुख्याध्यापिकेलाच एसीबी ने लाच घेताना अटक केली आहे.

कालबद्ध पदोन्नतीच्या फरकाचे बिल तसेच पूर्णवेळ ग्रंथपाल झाल्यानंतरचा फरक अदा करण्यासाठीचे बित काढण्यासाठी अडीच हजारांची लाच मागून प्रत्यक्षात २ हजार ३४० रुपयांची लाच स्वीकारताना धुळ्यातील श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती गिरीश जोशी (५६, रेल्वे स्टेशन मागे, धुळे) यांना विद्यालयातील त्यांच्या दालनातच धुळे एसीबीने शुक्रवारी सायंकाळी अटक केल्याने शैक्षणिक वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत.

या संदर्भात अधिक वृत्त असे की, तक्रारदार धुळ्यातील शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्णवेळ ग्रंथपाल आहेत. त्यांच्या सेवेला २४ वर्ष पूर्ण झाल्याने कालबद्ध पदोन्नतीच्या फरकाचे बिल तसेच पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर उन्नयन रुपांतर झाल्याच्या पगाराचा फरक अदा करण्यात आला नसल्याने तक्रारदाराने मुख्याध्यापिका जोशी यांची भेट घेतली असता मुख्याध्यापिका यांनी बिले अदा करण्यासाठी तक्रारदाराला अडीच हजारांची लाच मागितली.

तक्रारदाराने या संदर्भात धुळे एसीबीकडे मंगळवार, १३ जानेवारी रोजी तक्रार दिली.त्या नुसार सापळा रचण्यात आला. शुक्रवारी दुपारी मुख्याधिकारी जोशी यांनी स्वतःच्या दालनात लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. जोशी यांना शुक्रवारीच न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सदरची कारवाई धुळे एबीसीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, प्रवीण मोरे, मुकेश अहिरे, संतोष पावरा, कॉन्स्टेबल,जगदीश बडगुजर प्रवीण पाटील,मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, महिला कॉन्स्टेबल रेश्मा परदेशी, हवालदार सुधीर मोरे, यांनी केली .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!