मुख्याध्यापकाला भाऊ असल्याचे खोटे सांगून मुलीचे शाळेतून अपहरण करून अत्याचार
रावेर तालुक्यातील तरुणावर गुन्हा दाखल.
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना मुलीचा भाऊ असल्याचे खोटे सांगून घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना भुसावळ येथील एका शाळेत घडली. या प्रकरणी रावेर तालुक्यातील पाल येथील तौसीफ जहाबाद तडवी (रा. पाल, ता. रावेर) या तरुणाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शाळेतील मुलींचा व मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील रहिवासी असलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी भुसावळ येथील एका शाळेत शिकत होती. दिनाक ७ ऑगस्ट रोजी रावेर तालुक्यातील पाल येथील तौसीफ जहाबाद तडवी हा तरुण भुसावळ येथील शाळेत आला. त्याने मुख्याध्यापकांना लेखी अर्ज देऊन आपण मुलीचा भाऊ असल्याचे खोटे सांगून मुख्याध्यापकांची दिशाभूल करून त्यांची फसवून करून त्याने मुलीला आपल्यासोबत घेऊन गेला .नंतर त्याने मुलीला मुंबई, चोपडा आणि जळगाव या ठिकाणी तिला घेऊन गेला. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार ही केला.
त्यानंतर या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तात्काळ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता तौसीफ जहाबाद तडवी. रा. पाल. तालुका रावेर. याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख हे पुढील तपास करीत असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

