भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचाळीसगाव

मुख्यमंत्र्यांच्या बनावट सहीचे जॉइनिंग लेटर देऊन तरुणीची फसवणूक, चाळीसगाव मध्ये तिघांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट सहीचे रुजू पत्र (जॉइनिंग लेटर) देऊन चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील एका तरुणीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला.

चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील रहिवाशी असलेल्या एका तरूणीला मुबई येथील मंत्रालयात क्लर्कच्या नोकरीचे आमिष दाखवून बनावट जॉइनिंग पत्र देण्यात आले. हे पत्र थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरपॅडवर व त्यांच्या सहीसह देण्यात आल्याने प्रथमदर्शनी ते पत्र खरे वाटले.

दरम्यान, ख्यमंत्री कार्यालयातील अधिकृत नियमांनुसार रुजू पत्रावर मुख्यमंत्री नव्हे तर संबंधित विभागप्रमुख अथवा सचिवांची सही असते. मुख्यमंत्री कसे काय एखाद्या क्लार्क सारख्या नेमणूक पत्रकावर सही करतील. हे नातेवाईकांनी लक्षात आणून दिल्यानंतर तरुणीने मुख्य संशयित आरोपी सर्वेश प्रमोद भोसले याच्याकडे चौकशी केली असता, त्याने धक्कादायक माहिती दिली.

त्याने दिलेली धक्कादायक माहिती अशी की, जॉइनिंग लेटर मिळण्याबाबतचा तगादा वाढल्याने त्याने खडकी येथील स्वामी ग्राफिक्सवर रणजीत मांडोळे यांच्या मदतीने इंटरनेटवरून “cm officer letter maharashtra” असे सर्च केले आणि मिळालेल्या लेटरपॅडवर बनावट मजकूर टाईप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नकली सही टाकून रुजू पत्र तयार केल्याचे त्याने कबूल केले.

या सर्व फसवणूक प्रकरणात सर्वेश प्रमोद भोसले व रणजीत मांडोळे याचे सह या संपूर्ण प्रकारात तिसरा आरोपी तुषार उर्फ रोहीत मधुकर बेलदार याने देखील सहभाग घेतल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणात चाळीसगाव तालुक्यातील तिघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!