सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याला ८ लाखांची लाच घेताना अटक
धुळे,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |नंदुरबार विभागातील विद्युत उपविभागाचे उपअभियंता नितीन इंगळे यांना धुळे एसीबीने सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी धुळ्यातील सा.बां. विभागाच्या कार्यालयात अटक केली. विद्युत ठेकेदाराला अदा केलेल्या बिलाच्या मोबदल्यात साडेआठ लाखांची लाच मागून तडजोडीअंती आठ लाख रुपये स्वीकारताना ही अटक नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातच अटक करण्यात आली. या घटनेने लाचखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अधिक वृत्त असे की, नंदुरबार विभागातील विद्युत उपविभागाचे उपअभियंता नितीन इंगळे यांनी विद्युत ठेकेदाराला कामाच्या बिलाच्या बदल्यात ८ लाख ५० हजारांची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंती ८ लाख रुपये देणे ठरले. याबांदर्भात तक्रारदाराने धुळे एसीबी कडे तक्रार दाखल केली होती. धुळे एसीबीने आपला रचून नंदुरबार विभागातील विद्युत उपविभागाचे उपअभियंता नितीन इंगळे यांना धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच रंगेहात अटक केली.
सदरची कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृवात पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेशमा परदेशी, सुधीर मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

