दुचाकीला डंपरची जोरदार धडक, डॉक्टर मुलीचा वडिलांच्या डोळ्या समोरच मृत्यू !
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भरधाव डंपरच्या धडकेत वडिलांच्या डोळ्यादेखत डॉक्टर मुलीचा जागीच मृत्य झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी परिसरातील गोंदेगाव जवळ घडली.सिमेंट व्यावसायिक किशोर पेंढारकर यांची कन्या डॉ. स्नेहल प्रीतम रावते वय २४ वर्षे. यांचा सोमवारी रात्री सव्वा आठ वाजता जागीच मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी की, १६ जून रोजी डॉ. स्नेहल या वडील किशोर पेंढारकर यांच्यासोबत दुचाकीने भुसावळ येथे पासपोर्टच्या संदर्भातील कागदपत्रे पोलिसांना देण्यासाठी गेले होती. त्यानंतर कामे आटोपून दोघे जामनेर येथे आले.

जामनेर येथे त्यांनी नातेवाईकांकडे जेवण करून पाचोऱ्याकडे निघाले. रस्त्याने गोंदेगाव जवळ मागून भरधाव डंपरने जबर धडक दिली. त्यात डॉ. स्नेहल किशोर रावते पेंढारकर या जागीच चिरडल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. स्नेहल यांचा विवाह गेल्या दोन वर्षापूर्वी मूळचे खेडी (ता. चाळीसगाव) व हल्ली सुरत येथे राहत असलेल्या मुलाशी झाला होता. स्नेहल यांनी नुकतेच तीन वर्ष वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना लंडन येथे पुढील शिक्षणासाठी जायचे असल्याने पासपोर्ट काढण्यासाठी त्या भुसावळला गेल्या होत्या.मगळवारी दुपारी डॉ. स्नेहल यांच्यावर पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

