भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

किसान सह.दूध उत्पादक सोसायटी, सावदा च्या चेअरमन पदी अतुल नेमाडे तर व्हा. चेअरमन पदी रमेश येवले बिनविरोध

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा येथील किसान सहकारी दूध उत्पादक सोसायटी, सावदा येथे आज दि. १८ जून २०२५ रोजी चेअरमन व व्हा. चेअरमन निवडी साठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सर्वानुमते चेअरमन पदी  अतुल रामदास नेमाडे यांची  तर रमेश तोताराम येवले यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

संचालक मंडळ पुढील प्रमाणे –
चेअरमन – अतुल रामदास नेमाडे .
व्हा. चेअरमन :- रमेश तोताराम येवले.

संचालक सर्वश्री – निलेश अच्युत (फेगडे ), घनश्याम भंगाळे, भोजराज चौधरी, भुषण चौधरी, लतेश चौधरी, महेश चौधरी , रमेश इंगळे, विनोद जावळे, अर्चना नेमाडे , स्वप्नील पाटील, अक्षय सरोदे, निलिमा चौधरी, निलिमा राणे, धर्मदास बैरागी उपस्थित होते.

सभेस निवडणूक निर्णय अधिकारी वासुदेव पाटील यांनी कामकाज पाहिले. त्यांना संस्थेचे सेक्रेटरी व सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!