भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्रीडाधुळेभुसावळशैक्षणिक

भुसावळ च्या शिरपेचात मानाचा तुरा तिर्थराज पाटील चा विश्वविक्रमात डंका

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | २६ जानेवारी २०२६ रोजी संभाजीनगर येथे गारखेडा स्टेडियम मध्ये एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड USA या विश्वविक्रमाचे मुख्य आयोजक भिकन अंबे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व रेकॉर्ड ओफिशियल राधिका अंबे होते या उपक्रमात सहभागी सर्व स्केटर्सनी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ६:३० या वेळेत सलग १ तास २६ मिनिटे २६ सेकंद नॉन-स्टॉप स्केटिंग केले.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील विविध राज्ये, जिल्हे व शहरांमध्ये विद्यार्थी आपापल्या ठिकाणी एकाच वेळी हे स्केटिंग प्रात्यक्षिक सादर केले असून, एकूण १० हजारांहून अधिक विद्यार्थी या विश्वविक्रमात सहभागी झाले आहेत.या विश्वविक्रमात भुसावळ येथिल एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल व सिल्वर लाईन स्पोर्ट्स एकेडमी चा विद्यार्थी तिर्थराज मंगेश पाटील हा सहभागी झालेला होता. विश्वविक्रम पूर्ण झाल्यानंतर तिर्थराज ला *एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स  आणि बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड USA अधिकृत विश्वविक्रम पदक दिले गेले तसेच एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड USA ची अधिकृत प्रमाणपत्रे प्रदान केल जाणार आहे.

या विश्वविक्रमात सहभागी झालेल्या तिर्थराज चे आमदार राजुमामा भोळे ,भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ केतकी पाटील, आमदार अमोलभाऊ जावळे यांनी अभिनंदन केले .तसेच सर्व शिक्षक सोसायटी व शिक्षक संघटना यांच्यातर्फे विशेष कौतुकपर संदेश प्राप्त झाले आहे तिर्थराज च्या घरी तसेच नातेवाईक, परिवाराच्या मित्र परिवारामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!