भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

गणेशउत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावदा शहरात सकल हिंदू समाजातर्फे पंचक्रोषीतील गणेश मंडळांचे एकत्रीकरण सभेचे आयोजन

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गणेशउत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावदा शहरात सकल हिंदू समाजातर्फे पंचक्रोषीतील गणेश मंडळांचे एकत्रीकरण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

आपण सारेच धार्मिक आहोत पण धार्मिकता ही आपल्या आचरणात दिसत नाही त्यामुळे उत्सव होतात पण त्यातून अपेक्षित असणारी आध्यात्मिक उन्नती होत नाही. जे उत्सव ज्यांनी ज्या श्रध्येने व ज्या कारणाने सुरू केले होते त्यापासून आपण दूर गेल्याने त्यातून अपेक्षित हिंदू जागरण हा उद्देश हरवला आहे. हा उद्देश पुन्हा आपल्याला साधता यावा याकरिता या धर्म जागरण सभेचे आयोजन केले आहे .

धर्मजागृती सभेसाठी गुरु गोरक्षनाथ आखाडा पिलखेडा जिल्हा धुळे येथील प. पू. योगी दत्तानाथजी महाराज, सावदा येथील महानुभाव मठाचे गादीपती प. पू. आचार्य मानेकरबाबा शास्त्री, स्वामीनारायण गुरुकुलचे शास्त्री अनंतप्रकाशदासजी, स्वामीनारायण मंदिर सावदा चे कोठारी शास्त्री स्वयंप्रकाशदासजी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

सदरची सभा ही सोमवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२५ सोमवार रोजी संकल्पसिद्धी गणेश मंदिर, कोचुर रोड, सावदा. ता. रावेर या ठिकाणी संध्याकाळी – ४:३० वा. होणार आहे

या धर्मजागृती सभेला शहरातील व परिसरातील गणेश मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन धर्मजागरण सभेतर्फे करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!