भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

भुसावळ – जळगाव महामार्गावर भीषण अपघात, २२ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर जखमीं

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज |भुसावळ – जळगाव महामार्गावर इनोव्हा कार आणि कंटेनरच्या भीषण अपघात झाला या भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

भुसावळ – जळगाव महामार्गावरुन कारने वेगाने जात असताना अचानक डिव्हायडर सोडून ती पलिकडच्या लेनमध्ये गेली आणि समोरुन येणाऱ्या कंटेनरवर धडकली. कंटेनरने कारला चिरडलं आणि काही अंतर पुढे फरफटत नेलं. हा अपघात इतका भयंकर होता की इनोव्हा गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

मिळालेली माहिती अशी की, जळगावहून भुसावळ कडे पांढऱ्या रंगाची एक इनोव्हा कार वेगाने येत असताना अचानक महामार्गावर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित झाली. वेगात असलेल्या या कारने महामार्गावरील डिव्हायडर अक्षरशः तोडून थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसली. त्याच वेळी समोरून एक अवजड कंटेनर येत होता.

कंटेनर आणि इनोव्हाची समोरासमोर धडक

कंटेनर आणि इनोव्हाची समोरासमोर इतकी भीषण धडक झाली की, कारचा पुढचा भाग चुरडला गेला. लोखंडाच्या पत्र्यांमध्ये इनोव्हा कार मध्ये असलेले झोया आणि अरबान दोघेही अडकून पडले होते. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की आजुबाजूच्या लोकांनी धावत घटनास्थळ गाठलं. त्या वेळी गाडीचा अगदी चुराडा झाला होता. या कारमध्ये झोया नदिन पठाण (वय २२) आणि अरबान खान (वय २६) हे दोघे प्रवास करत होते

या धडकेत झोया पठाण हिचा जागीच मृत्यू झाला.तर
तिचा सोबती अरबान खान हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत सापडून आला. परिसरातील स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवलं. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!