भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

पुन्हा त्याच शहरात ४ वर्षाच्या चिमुरड्या विद्यार्थिनीवर शाळेच्या बसमध्ये चालकाकडून अत्याचार

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेच्या  बसमध्ये नराधम चालकाने ४ वर्षांच्या विद्यार्थीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर मध्ये काही महिन्यांपूर्वी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा बदलापूर शहरातीलच एका खाजगी इंग्रजी शाळेतील ४ वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बदलापूर पश्चिमेच्या इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेची बस होती. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर शहरातील एका खासगी इंग्रजी शाळेत ही घटना घडली आहे. बदलापूर पश्चिमेच्या इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेची बस होती. या बसमध्ये नराधम चालकाने ४ वर्षांच्या विद्यार्थीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. बसमध्ये कुणीही महिला मदतनीस नव्हती. त्यावेळी ही घटना घडली. पीडित चिमुरडी जेव्हा घरी पोहोचली तेव्हा हा सगळा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यावर ४ वर्षांच्या चिमुरडीसोबत घडलेल्या घटनेमुळे पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पीडित मुलीच्या पालकांनी लगेच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्या शाळेच्या व्हॅनमध्ये चार वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला ती व्हॅन फोडण्याचा प्रयत्न व आरोपी आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. या घटनेमुळे बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपी व्हॅन चालकाला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!