फिरायला जाण्याच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सोबत फिरायला चल असे सांगून सुरत येथे नेऊन तिच्यावर राहुल राठोड (वय २५) याने अत्याचार केला. हा प्रकार दि. ३० जानेवारी रोजी उघडकीस आला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या नात्यातीलच राहुल राठोड, वय २५ वर्ष. याने माझे बरोबर फिरायला चल अशा बहाण्याने दि. २९ जानेवारी रोजी सुरत येथे आपल्या बहिणीच्या घरी नेले. त्याठिकाणी दि. ३० जानेवारी रोजी रात्री त्याने मुलीवर अत्याचार केला.
या बाबत कोणालाही सांगू नको, सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. पीडित मुलीने जळगावात आल्यानंतर रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने राहुल राठोड यांचेवर पोक्सो कलमान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक निरीक्षक भूषण कोते हे करीत आहेत.


