भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

सावदा येथील श्री आ.गं. हायस्कूल व श्री.ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

सावदा, ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज | आज दिनांक ०५ -०२ -२० २६ गुरुवार रोजी श्री आ.गं. हायस्कूल व श्री.ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला .सदर पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सावदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मा. सौ . रेणुका राजेंद्र पाटील या होत्या, पारितोषिक वितरणाचे उद्घाटक श्री . सचिन चुडामण बऱ्हाटे, सभापती शिक्षण समिती नगरपालिका सावदा हे होते व पारितोषिक वितरण समारंभाचे वितरक मा . श्री .विशाल पाटील साहेब स .पो.नि.सावदा पोलीस स्टेशन हे होते .

समारंभाच्या प्रमुख पाहुणे म्हणून फिरोज खाँ हवीबुल्ला खाँ पठाण उपनगराध्यक्ष नगरपालिका सावदा त्याचप्रमाणे राजेश गजाननराव वानखेडे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक नगरपालिका सावदा. सौ . रेखा राजेश वानखेडे , सौ . रंजना जितेंद्र भारंबे गटनेता, सौ .जयश्री अतुल नेहते , सौ . सीमा वेडू लोखंडे, सौ सुनीता संजय तायडे ,सौ . प्रतीक्षा मनीष भंगाळे उपगटनेता , कु . सिमरन राजेश वानखेडे, हेमंत रूपा महाजन , नकुल नितीन बेंडाळे ,सुनील नेमीचंद जंगले तसेच पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष .सुभाष सुपडू तेली ,पालक श्रीकांत किशोर वाणी . मधुकर मेढे व इतर अनेक असंख्य पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते .त्याचप्रमाणे शेजारील पीएम श्री नानासाहेब विष्णूरी पाटील विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका पुष्पलता प्रवीण ठोंबरे मॅडम या उपस्थित होत्या .

श्री .सचिन चुडामण बऱ्हाटे यांनी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून सदर समारंभाचे उद्घाटन केले .तदनंतर प्राचार्य श्री पी.जी भालेराव सर , पर्यवेक्षक श्री संजय मोतीराम महाजन सर उपशिक्षिका कल्पना एम शिरसाट व संध्या पुरुषोत्तम चौधरी यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे संविधान चे पुस्तक व बुके देऊन नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगरसेविका यांचा सन्मान व स्वागत करण्यात आले .

सोहळ्याचे प्रास्ताविक प्राचार्य श्री पी.जी भालेराव सर यांनी केले व अहवाल वाचन श्री संजय मोतीराम महाजन सर यांनी केले व पाहुण्यांची मनोगते झाली .याप्रसंगी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . यामध्ये तरुण उद्योजक मनोज वसंतराव पाटील तसेच सौ प्रतीक्षा मनीष भंगाळे ,कुमारी सिमरन राजेश वानखेडे व पारितोषिक वितरक श्री विशाल पाटील साहेब यांनी मनोगत व्यक्त केले .

इयत्ता दहावी मधून प्रथम आलेला तनेश अशोक चौधरी याला सर्वाधिक पारितोषिक मिळाली : त्याचप्रमाणे इयत्ता बारावी मध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी अनुष्का रमाकांत कोष्टी हिला सुद्धा भरपूर पारितोषिक मिळाले . त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये विविध उपक्रम विविध स्पर्धा मग त्यामध्ये निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध खेळाच्या स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये ज्यांना ज्यांना यश प्राप्त झालेले आहे अशा सर्वांना पारितोषिक वितरित करण्यात आली .नंतर शालेय पारितोषिक वितरण सोहळा पार पडला .

त्यानंतर इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला त्या संदर्भात सभा झाली सदर सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री पी.जी भालेराव सर हे होते याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली व अतिशय सुंदर अशा आपल्या भाषणांमध्ये शिक्षकांप्रती व शाळेप्रती आपल्या कृतज्ञता व्यक्त केल्या याप्रसंगी बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या भावना न आवडता आल्यामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तळले व प्रसंग अतिशय गंभीर वातावरण निर्माण झाले त्याचा नंतर शिक्षकांनी मार्गदर्शनपर व शुभेच्छा पर आपली भाषणे दिली त्यामध्ये मनोज यशवंत महाजन संजय मोतीराम महाजन व अध्यक्षीय मनोगत श्रीपीजी भालेराव सर यांनी केले त्यानंतर हा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुंद व एनसीसी ग्रुप चे सर्व कॅडेट्स यांनी अतिशय मोलाची मदत दिली याप्रसंगी प्राचार्य श्री पीजी भालेराव सर यांनी दानशूर दात्यांचे व सर्व सन्माननीय नगरसेवक यांचे आपल्या मनोगत आतून आभार व्यक्त केले सदर समारंभाचे आभार प्रदर्शन श्री प्रणाली काटे मॅडम यांनी केले व सूत्रसंचालन कलाध्यापक श्री नंदकिशोर पाटील यांनी केले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!