भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

एरंडोलक्राईमजळगाव

महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह,परिसरात खळबळ, घटनास्थळी बियरची बाटली आढळल्याने घातपाताचा संशय

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका ३० ते ३५ वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या एरंडोल तालुक्यातील पद्मालय मंदिर परिसरातील घनदाट जंगलात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला. विशेष म्हणजे घटनास्थळी बियरची बाटली देखील मिळून आली असल्याने हा घातपात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला असण्याची शक्यता आहे.

एरंडोल तालुक्यातील पद्मालय मंदिर सुप्रसिध्द मंदिर असून या मंदिर परिसरात घनदाट जंगल आहे. मंदिर परिसरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात गुरुवारी एका महिलेचा मृतदेह असल्याचे काही स्थानिकांच्या निदर्शनास आले. या महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तिचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिसांनी घटनास्थळ गाठले.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक विनायक कोते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तपासाला गती देण्यासाठी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरील नमुने गोळा केले असून महिलेची ओळख पटवण्या सोबत घातपाताचे मोठ कोडं सोडविण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.


दरम्यान, मृतदेह आढळलेल्या ठिकाणाजवळ पोलिसांना बियरची एक रिकामी बाटली आणि इतर काही संशयास्पद वस्तू मिळाल्या असल्याने पोलिसांचा घातपाताचा संशय बळावला आहे. संबंधित महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. मयत महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, गुन्हेगारांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हे कृत्य केल्याचे दिसून येते.

मात्र ही मृत महिला कोण? याबांदर्भात अजून कुठलीही माहिती समोर आली नसून पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवला आहे. संबंधित महिला नेमकी कुठली आहे? तिचा खून कोणी आणि का केला? याबाबत अद्याप कोणतेही ठोस धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नसले तरी पोलिस कसून तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!