भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

भोरगाव लेवा पंचायत मुंबई विभाग युवा समिती प्रमुखपदी मयुरेश नरेंद्र कोल्हे यांची नियुक्ती

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया, पाडळसे (ता. यावल, जि. जळगाव) अंतर्गत मुंबई विभागाच्या युवा समितीच्या प्रमुखपदी श्री. मयुरेश नरेंद्र कोल्हे (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती पंचायतच्या मुख्य शाखेच्या कार्यकारिणी बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आली आहे.


नियुक्तीनंतर श्री. कोल्हे यांनी युवा समिती प्रमुख म्हणून कार्य सुरू करावे, असे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. पंचायतचे ध्येय धोरण, लेवा समाजातील युवक-युवती यांच्यात संघटन वाढवणे, समाजातील विविध विषयांवर जनजागृती करणे, विवाहपूर्व समुपदेशन, शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिक तसेच सामाजिक उपक्रम राबवणे या जबाबदाऱ्या युवा समितीमार्फत पार पाडावयाच्या आहेत.
ही नियुक्ती कुटुंबनायक श्री. ललितकुमार रमेश पाटील तसेच अॅड. श्री. संजय मनोहर राणे (सचिव) यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली आहे.


या नियुक्तीबद्दल समाजातील विविध स्तरांतून श्री. मयुरेश कोल्हे यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विभागात युवक संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!