अट्टल मोटारसायकल चोराला मध्य प्रदेशातून अटक, सव्वादोन लाखांची वाहने जप्त
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ पोलिसांनी कारवाई करत एका मोटारसायकल चोराला मध्य प्रदेशमधील बऱ्हाणपूर येथून अटक करून त्याचे कडून चोरीच्या ३ मोटारसायकली (किंमत २, २५,००० ) हस्तगत करण्यात आल्या. सुनील पांडुरंग इंगळे रा.भुसावळ, पांडुरंगनाथ नगर, यांची बुलेट मोटारसायकल चोरी झाली होती. याबाबत त्यांनी बाजारपेठ पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. हा चोरीचा गुन्हा उधळकिस आल्याने या पूर्वी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे येथील उघडकीस आले आहेत.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना त्यांच्या गुप्त माहिती मिळाली की, बुलेट चोरीचा आरोपी बऱ्हाणपूर येथे आहे. डी.बी. पथकाने तात्काळ बऱ्हाणपूर येथे जाऊन आरोपी अरशद खान अहमद खान (वय २२, रा. खाजा नगर, आझाद नगर, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने आपल्या अल्पवयीन साथीदारासह मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.आरोपीकडून एकूण ३ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यात चोरी झालेल्या रॉयल एनफिल्ड बुलेट (क्र. एमएच १९ ईडी ७६५०) तसेच बजाज कंपनीची प्लॅटीना (क्र. एमएच-१९-डीएस ३७२२) आणि एक लाल रंगाची नंबर नसलेली बजाज सी.टी. १०० मोटारसायकल यांचा समावेश आहे. या वाहनांची एकूण किंमत २,२५,००० रुपये आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्यासह विजय नेरकर, कांतीलाल केदारे, किरण धणगर, रविंद्र भावसार, सुनील सोनवणे, सचिन चौधरी, हर्षल महाजन, जीवन कापडे, महेंद्र पाटील, जावेद शहा, भुषण चौधरी, अमर अढाडे, प्रशांत सोनार, योगेश माळी, योगेश महाजन आदींनी ही यशस्वी कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार विजय बळीराम नेरकर करत

