भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

ॲल्युमिनियमचे भांडे खेळताना मुकुट समजून साडेतीन वर्षाच्या बालकाने घातलं डोक्यात….

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एक धक्कादायक घटना जळगाव मधून समोर आली. खेळताना साडेतीन वर्षाच्या बालकाने ॲल्युमिनियमचे भांडे डोक्यात घातले. मात्र ते काही केल्याने निघत नव्हते.

जळगाव शहरात खेळताना साडेतीन वर्षांच्या बालकाच्या डोक्यात ॲल्युमिनियमचे भांडे अडकल्याची धक्कादायक घटना घडली.बालकाने मुकुट समजून डोक्यात घातलेले भांडे घट्ट अडकल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.
अखेर, सहारा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. मिन्हास पटेल यांनी प्लंबरच्या मदतीने ग्राइंडर कटरचा वापर करून १२ मिनिटांच्या ऑपरेशन मध्ये मुलाची यशस्वी सुटका केली. बालक सुखरूप आहे

ही घटना १८ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडकीस आली असून, वेळेवर उपचार मिळाल्याने मुलाचा जीव वाचला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!