भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावल

यावल तालुक्यात उष्माघाताचा बळी, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश ही लावलेले आहेत. तापमान ४६ अंश सेल्शियस च्या वार गेल्याने जनता त्रस्त झाले आहेत.यातच यावल तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतमजूर तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

यावल तालुक्यातील दहिगाव येथील महाजन गल्लीतील शेतमजूर वैभव धर्मराज फिरके, वय २७ वर्ष. यांचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. वैभव हा नुकताच शेतातून घरी परतला असता सायंकाळी पाच वाजेचे सुमारास त्यास अस्वस्थ वाटू लागले. त्याच्यावर खाजगी डॉक्टरांनी उपचार करीत असतांना तो मयत स्थितीत आढळून आला. वैभव फिरके यांचा मृत्यू वाढत्या तापमानाने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उष्माघाताने बळी गेल्याची ही यावल तालुक्यातील दुसरी घटना आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!