भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

बाप्पाचे विसर्जन करताना तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

जळगाव, मंडे टु मंडे न्युज| गणपती बाप्पाला विसर्जन करताना जळगाव जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली.
जिल्ह्यातील मुमुराबाद येथील तरुण पाळधी-तरसोद दरम्यान गिरणा नदीवरील नव्याने उभारलेल्या पुलाजवळ विसर्जनासाठी गेलेल्या मुमुराबाद येथील गणेश गंगाराम कोळी. वय २७ वर्षे.या तरुणाचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली.

अधिक माहिती अशी की, मुमुराबाद येथील गणेश गंगाराम कोळी वय २७ वर्ष हवतरून आपल्या कुटुंबासोबत घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास नदीकाठी गेला होता. विसर्जनासाठी नदीत उतरल्यावर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक बुडू लागला. त्याचे कुटुंबीय व इतरांनी आरडाओरड करून वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रवाह प्रचंड असल्याने त्याला वाचवता आले नाही.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, ग्रामस्थ व पोलिसांनी शोधमोहीम राबवली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता तो मिळून आला नाही. रविवारी सकाळपासून आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी आणि कानळदा परिसरात शोध सुरू ठेवण्यात आला आहे. गणेश कोळीच्या अचानक जाण्याने कुटुंबियांसह संपूर्ण मामुराबाद गाव दुःखात बुडाले असून,ममुराबाद गावावर शोककळा पसरली असून गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. पाटबंधारे विभागाकडून धरणाचे सहा दरवाजे उघडले गेले असून ९,७६८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या धरणात ९६ टक्के पाणीसाठा असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!