भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

रेल्वेत चढताना तोल गेल्याने रावेर येथील तरुणाचा रेल्वे खाली मृत्यू

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर येथील ३९ वर्षीय तरुणाचा १० मार्च सोमवार रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तरुणाचा जळगाव रेल्वेस्थानकावर रेल्वे चढत असतांना तोल गेल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

रावेर येथील अनिल जाधव हे पत्नी आणि मुलगा यांच्या सोबत रावेर शहरात राहत असून गेल्या दोन दिवसांपुर्वी अनिल जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने वाढ दिवस साजरा करण्यासाठी ते जळगाव येथील सासरवाडीला पत्नी व मुला सोबत आलेले होते.

१० मार्च सोमवार रोजी मुलाचा वाढदिवस आटोपून रात्री ९ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर रावेर येथे जाण्यासाठी आले असता रात्री ९ वाजता आलेली कामयानी एक्सप्रेस चालत असताना त्या एक्सप्रेस मध्ये चढतांना अनिल जाधव यांचा तोल जाऊन ते रेल्वेखाली आल्याने त्यांचा  जागेवरच मृत्यू झाला.

स्थानिक रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मंगळवारी ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात या बाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!