यावल तालुक्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील ३६ वर्षीय तरुण निलेश सुधाकर सोनवणे याने आपल्या राहत्या घरात बेडशीटच्या साह्याने गळफास घेतला. ही घटना यावल तालुक्यातील शिरसाड गावात सोमवारी उघडकीस आली.
यावल तालुक्यातील शिरसाड येथील निलेश सुधाकर सोनवणे याने आपल्या घरात लाकडी आड्याला बेडशीटच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या याप्रकरणी यावल पोलिसांना रवींद्र सोनवणे यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सोनवणे

