यावल तालुक्यातील तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू
यावल, मंडे टु मंडे न्युज | एका ३५ वर्षीय तरुणाचा विहीरित पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी तालुक्यातील यावल तालुक्यातील दहिगाव गावात घडली. काशीनाथ हिरामण सोनवणे हा तरुण दहीगावच्या शेत-शिवारातील शेतविहिरीत डोकावत असताना तोल जाऊन विहिरीत पडले. विहिरीतून काढून त्याला तातडीने तेथुन काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मयत घोषित केले.

याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुनील पाटील करीत आहे.


