अवैध वाळूच्या ट्रॅक्टरसह ड्रायव्हर फरार, दोघांवर गुन्हा दाखल
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | वाळूची अवैध वाहतूक होत असताना ग्राममहसुल अधिकाऱ्याने यावल तालुक्यातील डोंगरकठोरा रस्त्यावर आश्रम शाळा फाट्याजवळ वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर पकडले,त्याचा पंचनामा सुद्धा केला. अवैध वाळूचे ट्रॅक्टर तहसीलमध्ये नेण्यास सांगितल्यावर ट्रॅक्टर ड्रायव्हर सह आणखी एक असे दोघे ट्रॅक्टर घेऊन पसार झाले.

अधिक माहिती अशी की,कुंदन शंकर कोळी (भालशीव, ता. यावल) हा यावल तालुक्यातील डोंगरकठोरा या गावाच्या फाट्यापासून डोंगरकठोरा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आश्रम शाळा फाट्याजवळ एका ट्रॅक्टरमध्ये वाळू चोरी करून नेत असता ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील यांनी ट्रॅक्टर मालक व ड्रायव्हर यांना वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांचे कडे परवाना नसल्याने त्या अवैध वाळू असलेल्या ट्रॅक्टरचा पंचनामा करून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले असता या दोघांनी तेथुन थेट ट्रॅक्टर घेवून पळ काढला.
या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून कुंदन शंकर कोळी (भालशीव, ता. यावल) याचे सह ड्रायव्हर दोघांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शना खाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.

