भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

लोखंडी जळीत वस्तूने तरुणाच्या डोक्यात वार, तरुण गंभीर जखमी, रावेर तालुक्यातील घटना

सावदा, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील सावदा येथे धार्मिक सामुहिक कार्यक्रमात एका तरूणाला लोखंडी वस्तूने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना १८ सप्टेंबर बुधवार रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली.

या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सावदा येथे पिंपरुड रोड वरील रविवारचा बाजार भरतो त्या ओटे असलेल्या बाजारपट्टा परिसरात बुधवार रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला, पुरुषांची मोठी गर्दी होती. सामाजिक कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमात सय्यद मोईन सय्यद सलीम वय २४ वर्ष . रा. मोठा आखाडा. सावदा. हा देखील आलेला होता. तसेच हैदर शेख मंजूर, वय ३७ वर्ष. रा. मोठा आखाडा, सावदा. हा देखील आला असता हैदर शेख मंजूर याने सैय्यद मोईन याच्याकडे रागाने पाहिले. असता याचा जाब सय्यद मोईन याने हैदर शेख याला विचारला असता हैदर शेख याने हातात लोखंडी वस्तू घेवून सैय्यद मोईन याच्या आंगावर धाऊन जात रागारागात सय्यद मोईन याच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारली .त्यात सय्यद गंभीर जखमी झाला.

सय्यद मोईन याने दीलेल्या फिर्यादी वरून सावदा पोलिस स्टेशनला  हैदर शेख मंजूर. वय ३७ वर्ष. रा. मोठा आखाडा सावदा.ता. रावेर. याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहून सानप हे करीत आहे.

दरम्यान, या घटनेचे कारण अद्याप स्पस्ट झालेले नसले तरी या बाबत अधिक माहिती मिळविली असता पूर्वीच्या वादावरून ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. जखमी तरुण सय्यद मोईन याला उपचारार्थ प्रथम सावदा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करून नंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!