केऱ्हाळे खूर्द येथिल युवक नेत्ररोग तज्ञ एम.एस पदविकेत यशस्वी.
केऱ्हाळा. ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज. सतीश निकम l रावेर तालुक्यातील केऱ्हाळे खुर्द येथील डॉ.अनिरुद्ध दिलीप सोनवणे यांनी नवी मुंबई येथील डॉ.वाय.पाटील विद्यापीठातून एम.एस.पदवी पूर्ण केली. डॉ.अनिरुद्ध दिलीप सोनवणे, हे केऱ्हाळे येथील माजी सरपंच स्व.दिलीप पांडुरंग सोनवणे यांचे सुपुत्र असून यांनी अगदी कठीन परिस्थितीत वडिलांच्या मृत्यू नंतर डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई येथून नेत्रशस्त्रक्रिया (आयु) मध्ये मास्टर ऑफ सर्जरी (एम.एस.) पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली.
हा त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील व त्याच्या वडिलांच्या स्वप्नातील एक महत्त्वाचा टप्पा असून त्यांच्या समर्पण आणि कष्टांचे प्रतिबिंब असून. माझ्या यशाचे सर्व श्रेय माझे वडील स्व.दिलीप सोनवणे यांना समर्पित करतो असे लोकमतशी बोलतांना डॉ. अनिरुद्ध सोनवणे म्हनाले. ज्यांच्या मूल्यांनी त्यांना नेहमी प्रेरित केले. त्यांचे कुटूंब,नातेवाईक व मित्र परिवार आणि डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाने त्याच्या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले. केऱ्हाळे सह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.