पोलिस भरतीत मैदानी चाचणीत धावताना जळगाव जिल्ह्यातील तरुणाचा मृत्यू
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पोलिस भरती दरम्यान धावताना धाप लागून अमळनेर येथील अक्षय मिलिंद बिऱ्हाडे, वय २४ वर्ष. या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २९ रोजी बालेगाव, जि. ठाणे. येथे घडली.
अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील अक्षय मिलिंद बिऱ्हाडे हा तरुण २७ रोजी पोलिस भरतीसाठी बालेगाव येथे गेला होता.२९ रोजी मैदानी चाचणीसाठी धावत असताना ३-४ किमी धावल्यानंतर त्याला भोवळ आली, अन् तो जमिनीवर कोसळला. त्याला ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. एकुलता एक मुलगा गमविल्याने आई-वडिलांनी टाहो फोडला. अक्षय हा अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात कला शाखेच्या अंतिम वर्षाला होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे.