यावलसामाजिक

आमोदा येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती मार्फत शिव जयंती साजरी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

आमोदे.ता यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। महाराष्ट्राचे कुलदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने यावल तालुक्यातील आमोदे गावात छत्रपती शिवाजी महाराजांनच्या जयंती निमित्त समस्त तरुण मित्र मंडळी मार्फत लेवा श्री राम मंदिरा समोर छत्रपती शिवाजी महाराज्यांचे एक दिवशीय स्मारक उभारून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती आमोदे व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकदिवशीय स्मारकाचे सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले त्यास गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. तसेच रक्तदान शिबिरानंतर शिवश्री इंजि. गजानन भदाणे यांचे शिव व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी रावेर लोकसभा खासदार – रक्षाताई खडसे , प्रमुख पाहुणे स.पो.नि.सिद्धेश्वर आखेगावर ,भरत महाजन,उपसभापती कृषी उत्पन्न समिती यावल उमेश पाटील ,आमोदे सरपंच – हसिना तडवी , उपसरपंच – पौर्णिमा भंगाळे , सन्मानित सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत आमोदे ,जनरल मँनेजर जिल्हा उद्योग केंद्र बुलढाणा – सुनिल पाटील , पोलीस पाटील आमोदे – तुषार चौधरी, यावल तालुका चिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा – सचिन चौधरी , यावल तालुका अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ – चेतन चौधरी , प्रकल्प धारक MCL ग्राम प्रकल्प आमोदे – ललित महाजन , माऊली कृषी केंद्र आमोदे ,माजी कृषी अधिकारी यावल – वासुदेव पाटील व समस्त तरुण मित्र मंडळी , आमोदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!