भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

अबबब ..१ कोटींची लाच… व्यापारी अटकेत तर आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक फरार…

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी बिल्डरला एक कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक व पोलिस हवालदार फरार असून लाच स्वीकारणाऱ्या खाजगी ईसमाला अटक करण्यात आली आहे.

यातील २७ वर्षीय तक्रारदार पुरुष आणि त्याचा खाजगी चालक यांनी मासाहेब जिजाऊ मल्टी स्टेट बँकेचे संस्थापक संचालक बबन शिंदे यांचे शाळेच्या ईमारती च्या बांधकामा करीता मटेरीअल पुरवले होते . मोबदला म्हणुन ६० लाख रुपये बबन शिंदे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना दिले होते . तथापी पोलीस स्टेशन शिवाजी नगर बीड येथे बबन शिंदे व इतरांवर बॅंक अपहार प्रकरणी गुन्हा नं ३६०/२३ दाखल असुन तपास पोलीस नीरिक्षक हरिभाऊ खाडे आर्थिक गुन्हेशाखा बीड हे करत आहेत .

यातील तक्रारदार व साक्षीदार यांना बबन शिंदे याने दिलेली ६० लाख रक्कम बॅंक अपहारातील आहे असे भासवून नमुद गुन्ह्यांत तक्रारदार व साक्षीदार यांना आरोपी करण्याचा धाक दाखवून तसेच तक्रारदार व साक्षीदार यांची मालमत्ता जप्त करण्याची भिती दाखवून यातील लोकसेवक सहाय्यक फौजदार रविभूषण जाधवर यांनी तक्रारदार यांचेकडे स्वत:साठी एक लाख रुपये मागणी करुन पो.नी. हरिभाऊ खाडे यांना लाच रक्कम मिळुन देण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच पो. नी. हरिभाऊ खाडे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना प्रत्येकी ५० लाख या प्रमाने , एक कोटी रुपये लाचेची मागणी करुन तडजोड अंती ,३० लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले .

तसेच तक्रारदार यांचेकडुन पहीला हप्ता म्हणुन ५ लाख रुपये खाजगी इसम कुशाल जैन मौजकर टेक्सटाईल यांचेकडे देण्यास सांगितले .त्यावरुन दिनांक १५/५/ २४ बुधवार रोजी सापळा कारवाईचे आयोजन मौजकर टेक्सटाईल सुभाष रोड बीड येथे केली असता, खाजगी इसम कुशाल जैन याने पोनी हरिभाऊ खाडे यांचे सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडुन पंचा समक्ष ५ लाख रुपये स्वीकारताच त्यास लाच रकमेसह पकडण्यात आले . पोलीस नीरिक्षक हरिभाऊ खाडे वय ,५२ वर्ष , पोलीस निरीक्षक ,आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधिक्षक कार्यालय बीड वर्ग १ रा. चानक्यपुरी बीड. सहायक फौजदार रविभुषन जाधवर, सहायक फौजदार आर्थिक गुन्हेशाखा बीड. व खाजगी इसम कुशाल प्रविण जैन वय २९ वर्ष रा मंत्री कॅालनी बीड. खाजगी ईसम. यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदरची कारवाई सापळा अधिकारी –शंकर शिंदे पोलीस उपअधिक्षक ला. प्र. वि .बीड. सह सापळा अधिकारी : पोलीस निरीक्षक युनुस शेख ला.प्र.वि. बीड. संतोष घोडके पोनी, आणि अनितात ईटुबुने पोनी ला.प्र. वि. छत्रपती संभाजीनगर. अविनाश गवळी , भरत गारदे, अमोल खरसाडे,अंबादास पुरी, हनुमान गोरे , सुरेश सांगळे , स्नेहल कुमार कोरडे. गणेश मेहेत्रे निकाळजे व नेहरकर डला. प्र. वि.बीड. यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!