भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिकराजकीय

मोठी बातमी : नाशिक मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या बॅगांची तपासणी, काय सापडलं या बॅगांमध्ये?

नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची नाशिकमध्ये तपासणी करण्यात आली. हेलिपॅडवर उतरल्यानंतर लगेच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.मुख्यमंत्र्यांच्या सोबत असलेल्या बॅगांमध्ये पैसे असल्याचं आरोप संजय राऊत यांनी केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नुकतेच एकनाथ शिंदे नाशिकमध्ये दाखल झालेत. नाशिकमध्ये मुख्यमंत्री दाखल होताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलीय. परंतू तपासणीनंतर शिंदे यांच्या बॅगांमध्ये काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही. मुख्यमंत्री यांचे सोबत दोन ते तीन बॅगा होत्या .काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे प्रचार सभेसाठी गेले असता त्यांच्या सोबत पैशांच्या बॅगा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आज जेव्हा एकनाथ शिंदे नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोबत असणाऱ्या बॅगांची तपासणी केली. मी आज पण बॅगा घेऊन आलोय असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!