आठ हजारांची लाच भोवली, औषध निरीक्षका सह खाजगी पंन्टर एसीबी च्या जाळ्यात
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l पशुपक्षी फार्मचे दुकान सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासना चा परवाना देणे साठी आठ हजारांची लाच घेताना औषध निरीक्षका सह खाजगी पंन्टर धुळे एसीबी च्या जाळ्यात अडकले असून औषध निरीक्षक हे जळगाव येथे राहतात.
तक्रारदार यांना शिरपूर येथे पशुपक्षी फार्मचे दुकान सुरू करावयाचे असल्याने त्यांनी दुकानाचा परवाना मिळणे करिता दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासन धुळे विभागाकडे ऑनलाइन अर्ज केला होता. सदर अर्जाबाबत तक्रारदार व त्यांचा आते भाऊ यांनी धुळे येथील औषध निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख, यांची त्यांचे कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना ते शिरपूर येथे तुषार भिकचंद जैन खाजगी पंन्टर यांचे सह दि. ४ मार्च २०२५ रोजी त्यांचे दुकानावर येऊन स्थळ परीक्षण करतील तेव्हा तुषार भिकचंद जैन खाजगी पंन्टर यांच्याकडे ८०००/- रुपये द्यावे लागतील त्याशिवाय मी पुढील कार्यवाही करणार नाही असे सांगितल्याने तक्रारदार यांनी ४ मार्च २०२५ रोजी तक्रार दिली होती.

सदर तक्रारीची दि. ४ मार्च २०२५ रोजी पडताळणी केली असता औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी तक्रारदार यांच्या दुकानाचे स्थळ निरीक्षण केले तेव्हा त्यांच्यासोबत आलेले खाजगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडे ८०००/- रुपये लाचेची मागणी करून औषध निरीक्षक देशमुख यांनी तक्रारदार यांना लाच
देण्यास दुजोरा देऊन प्रोत्साहित केले होते. आज दि. ११ मार्च २०२५ रोजी सापळा लावला असता खाजगी इसम तुषार जैन यांनी पंचासमक्ष तक्रार यांच्याकडे लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारली तेव्हा
किशोर सुभाषराव देशमुख, वय – ४४ वर्ष, औषध निरीक्षक (वर्ग २) धुळे. रा. फ्लॅट नंबर २०२, मोरया हाइट्स, मानराज पार्क स्टॉप, नवजीवन सुपर शॉपिंच्या मागे, द्रोपती नगर, जळगाव तसेच तुषार भिकचंद जैन, वय- ३६ वर्ष, (खाजगी इसम ), रा. मराठी गल्ली, शिरपूर, धुळे यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.
सदरची कारवाई सापळा पर्यवेक्षण अधिकारी – सचिन साळुंखे,पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग.धुळे. सापळा व तपासी अधिकारी- रूपाली रा. खांडवी,पोलीस निरीक्षक ला.प्र. विभाग, धुळे. पो.हवा. राजन कदम, पो. कॉ. प्रशांत बागुल, पो. कॉ. बडगुजर सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट यांनी केली.