चेक बाऊन्स प्रकरणी आरोपीला न्यायालयाच्या आदेशाने हरियाणा येथून अटक
रावेर तालुक्यातील घटना
सावदा. ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर कोर्टाकडील प्रकरणातील पकड वॉरंट मधील आरोपी जयप्रकाश नारायण गुप्ता, रा. कुंडली बॉर्डर हरियाणा याने सावदा येथील केळी व्यापारी रितेश संतोष पाटील, रा.सावदा यांचेकडून २१ लाख रुपये किमतीची केळी माल विकत घेऊन त्याचे मोबदल्यात पैसे परत न करता चेक दिला होता सदरचा चेक हा बँकेत दाखल केल्यावर चेक बाउन्स झाल्या प्रकरणी तक्रारदार यांनी रावेर न्यायालयात दाद मागितली होती.
सदर प्रकरणातील आरोपीस सावदा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सहाय्यक फौजदार बशीर तडवी व पोलीस हवलदार सिकंदर तडवी असे पथक तयार करून हरियाणा येथे पाठवून सदर पथकाने आरोपीचा शोध काढून त्यास शिताफीने अटक करून हरियाणा येथून सावदा पोलिस स्टेशनला आणून त्या आरोपीस रावेर न्यायालयात हजर केले असता त्यास जळगाव येथील सबजेल ला वर्ग करण्यात आले.