सुकी नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक करताना २ ट्रॅक्टर वर कारवाई
निंभोरा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज, जगजीवन मोरे l रावेर तालुक्यातील वडगाव शिवारातील सुकी नदीपात्रातून अवैध रित्या रेती वाहतूक करताना २ ट्रॅक्टर पकडण्यात आले. ही कारवाई ही रावेर तहसीलदार बंडू कापसे मार्गदर्शनाखाली संयुक्तरित्या करण्यात आली.
रावेर तालुक्यातील वडगाव शिवारातील सुकी नदीपात्रातून अवैध रित्या रेती वाहतूक करताना समाधान गोविंदा पाटील ट्रॅक्टर क्रमांक MH 19 AN 5085 , व विलास धनराज तायडे (विनाक्रमाक नसलेलं ट्रॅक्टर ) अशी दोन ट्रॅक्टर पकडण्यात आली.
सदरची कारवाई संयुक्त पथक मंडळ अधिकारी , श्री अनंत खवले, यासीन तडवी , रवि वानखेडे, प्रवीण वानखेडे, प्रवीण नेहते, मंडळ अधिकारी , रवि शिगणे, रशीद तडवी, सुधीर खरात, अभिजीत डांगे भाग्यश्री बर्वे, दिपाली बुंदेले, ग्राम महसुल अधिकारी, विकास माळी, महेंद्र चौधरी, गणेश चौधरी,सिद्धांत लोखंडे, तुषार चौधरी महसूल सेवक,शिपाई सुनिल सोनार यांनी संयुक्त रित्या कारवाई केली.
