भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीय

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी

नवी दिल्ली, मंडे टु मंडे न्युज l शनिवारी रात्री ९:२६ वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १४ महिला आणि ३ मुले आहेत. २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. लोक नायक जय प्रकाश रुग्णालयाने मृत्यूची पुष्टी केली आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला, त्यात ३ मुलांचा समावेश आहे. तर २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेनंतर प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी झाली. ट्रेन प्लॅटफॉर्म १२ वरून १६ वर हलवण्यात आली. दरम्यान, प्लॅटफॉर्म १६ च्या दिशेने जाण्यासाठी लोक फूटओव्हरवरून धावू लागले आणि चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर गर्दीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. महाकुंभला जाणाऱ्या २ गाड्या उशिरा आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली.

तिकीट काउंटरवर बरेच लोक होते. यापैकी ९०% प्रयागराजला जात होते. अचानक ट्रेन आल्याची घोषणा झाली आणि लोक तिकिटे न घेता प्लॅटफॉर्मकडे धावले. यामुळे चेंगराचेंगरी झाली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!