क्राईमभुसावळ

भुसावळ मध्ये प्रौढाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट भागातील डिगंबर बढे. वय ५२ वर्ष. यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गंगाराम प्लॉटमधील नमस्कार मंडळाच्या मागील बाजूस रहिवासी असलेले डिगंबर बढे ( वय ५२ ) यांनी आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली असून पोलीस निरिक्षक राहूल वाघ यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास सुरू आहे. आत्महत्या का केली हे अद्याप समोर आलेले नसले तरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!