मा. आ. एकनाथराव खडसे अमृत सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांचे आवाहन
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके | माननीय आमदार, मा. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे वयाची ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या औचित्याने, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘अमृत महोत्सव सप्ताह’ आयोजित करण्याचे ठरलेले आहे. या अमृत महोत्सव सप्ताहानिमित्त दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी, रविवार सकाळी ११ वाजता अमृत महोत्सवी सोहळा संत मुक्ताई मंदिर, कोथळी येथे संपन्न होणार आहे. या सर्वपक्षीय अमृत सोहळा कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी केले आहे.
नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक
या अमृत सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात मुक्ताईनगर येथील खडसे फार्म हाऊस येथे नियोजनाची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये अमृत महोत्सव समितीचे सचिव प्रा. डॉ. सुनील नेवे सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली, तसेच विविध प्रकारच्या ज्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत, त्याबाबत सविस्तर माहिती दिली.
विशेष उपक्रम
या अमृत महोत्सव सोहळ्याला सर्वपक्षीय केंद्रीय व राज्यस्तरावरील नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी दिली. तसेच, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत ‘भागवत सप्ताहा’चे आयोजन करण्यात आलेले आहे, याबाबतही त्यांनी माहिती दिली.
या बैठकीला माजी सभापती श्री. निवृत्ती पाटील, माजी सभापती श्री. अनिल वराडे, माजी सभापती श्री. विलास धायडे, माजी सभापती श्री. दशरथ कांडेलकर, माजी सभापती राजेंद्र माळी, माजी जि.प. सदस्य श्री. कैलास चौधरी, माजी जि.प. सदस्य श्री. रामदास पाटील, माजी सभापती श्री.गणेश पाटील, माजी सभापती श्री.विकास पाटील, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर व संचालक मंडळी, सरपंच डॉ. बी.सी. महाजन, श्री. ईश्वर रहाणे, सरपंच श्री.नारायण चौधरी, श्री.प्रभाकर झोपे, माजी जि.प. सदस्य निलेश पाटील, श्री. रामभाऊ पाटील, श्री. प्रशांत (आबा) पाटील, श्री.किशोर महाजन, श्री.वसंत पंढरीनाथ पाटील, श्री.भागवत पाटील, श्री.अतुल पाटील, श्री.विकास पाटील, श्री.पराग पाटील, श्री.अजय भारंबे, श्री.ज्ञानेश्वर पाटील, श्री.किशोर गायकवाड, श्री.नंदकिशोर हिरोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


