तोंड दाबून महिलेवर लैंगिक अत्याचार, कोणाला सांगितले तर मारून टाकण्याची धमकी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत घरात घुसून जबरजस्ती २४ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दील्याची घटना ९ ऑक्टोबर बुधवार रोजी रात्री जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरात घडली.
जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात कुटुंबासह राहणारी २४ वर्षीय महिला बुधवार ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री महिला ही आपल्या मुलांसह झोपलेली असताना संशयित आरोपी मंगेश उर्फ मंगलदास कोळी हा महिलेच्या घरात घुसून महिलेचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच “तू जर कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकेल” अशी धमकी दिली.
पीडित महिलेने या संदर्भात रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता आरोपी मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी वय ४० वर्ष. रा. हरिविठ्ठल नगर ,जळगाव. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहे.