भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमराष्ट्रीय

ब्रेकिंग : अहमदाबादच्या विमान अपघातात सर्वच्या सर्व २४२ जणांचा मृत्यू! कुणीच बचावलं नाही..

अहमदाबाद, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गुजरात मधील अहमदाबाद शहरातून आज सकाळी एक मोठी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या प्रवासी विमानाचा मेघानीनगर परिसरात अपघात झाला आहे.या विमानात एकूण २४२ प्रवासी होते.त्या सर्व च्या सर्व २४२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.अशी माहिती असोसिएटेड प्रेस ने दिली आहे.

एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादवरुन लंडनला जात होते. हे विमान टेक ऑफनंतर अगदी १० ते १५ मिनिटांतच कोसळले. या अपघातात सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हे विमान अहमदाबाद मधील मेघानीनगरात कोसळले.

दिल्लीहून अहमदाबादमार्गे इंग्लंडला जात असलेलं हे विमान रहिवाशी भागात पडले असून विमानामधून ५२ ब्रिटीश नागरिक प्रवास करत होते.

महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू
एअर इंडियाच्या या विमानात असलेल्या १२ केबिन क्रू मेंबर्सपैकी ३ कर्मचारी महाराष्ट्राचे तर तीन जण प्रवासी असे एकूण ६ जण असल्याची माहिती समोर आली आहे. अपर्णा महाडिक, मैथिली पाटील आणि रोशनी राजेंद्र सोनघरे या तीन महिला अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या या विमानात होत्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!