मोठी दुर्घटना : २४२ प्रवासी असलेलं एअर इंडियाचे विमान इमारतीवर कोसळले
अहमदाबाद, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |अहमदाबाद येथे एक मोठा विमान अपघात घडला आहे. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात दोन पायलट व २४२ प्रवासी होते. टेकऑफनंतर १५ मिनिटात विमान दुर्घटना झाली आहे. ही घटना मेघानीनगर परिसराजवळ घडली. दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या मैदानात कोसळले. आतापर्यंत किती प्रवाशांचा मृत्यू झाला, याची माहिती समोर आलेली नाही. ए एन आय या वृत्तानुसार गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे प्रवास करीत होते. यात १०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
अहमदाबाद येथे एअर इंडिया विमान अपघातामुळे खळबळ उडाली आहे. या अपघाताची दोन संभाव्य कारणे समोर आली आहेत. पहिले कारण म्हणजे विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला, ज्यामुळे हा अपघात घडला. दुसरे म्हणजे, प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान एका इमारतीवर जाऊन आदळले आणि त्यानंतर ते जळून खाक झाले. या घटनेनंतर अहमदाबादमध्ये धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. सध्या, बचाव कार्य सुरू असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
एअर इंडियाचे विमान कोसळल्याने संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला आहे. अहमदाबादमध्ये हा अपघात झाल्याने सर्वत्र धूर आणि मलबा पसरला आहे. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आकाशात धुराचे लोट दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान एका इमारतीवर आदळले, ज्यामुळे हा अपघात घडला. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विमानात २४२ प्रवासी होते.
इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान अहमदाबादमध्ये कोसळले आहे. त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २४२ प्रवासी होते. विमान लंडनला जात असताना, टेकऑफ दरम्यान विमानतळाच्या सीमेजवळ त्याचा स्फोट झाला. एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय-१७१ दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी वाजता उड्डाण केले. दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी अवघ्या दोन मिनिटात कोसळले. विमानतळ कॅम्पसला लागून असलेल्या एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ विमान कोसळले. विमान पडताच संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसले. विमान अपघाताचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आगीच्या ज्वाळा हवेत पसरल्याचे दिसून येत आहे.

