ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर घरी तर पेशंट दवाखान्यात, रूग्ण वाऱ्यावर….
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे,विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. १०/०२/२०२१ रोजी महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या असून १२ महिलांच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत शस्त्रक्रिया झालेल्या दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसभर डॉक्टर,नर्स, शिपाई सर्व स्टाफ हजर असतो परंतु रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात ना डॉक्टर,ना नर्स,ना शिपाई कोणीही आपल्या कर्तव्यावर हजर नसतात रात्री शस्त्रक्रिया झालेल्या महिलां जवळ महिला च असतात दवाखान्या चा एकही कर्मचारी राहत नाही ज्या कर्मचारी ची रात्रपाळी असते ते दवाखान्यात येतच नाही एका शिपाई ची रात्रपाळी असून तो कामावर न येता त्यांच्या बदलीचा एक रोजंदारी माणूस त्या ठिकाणी पाठवून देत असतो व तो घरी झोपा काढत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असून दररोज दिवसपाळीला दोघांनी येणे गरजेचे असते परंतु हे वैद्यकीय अधिकारी रोज ची आळीपाळीने एक दिवस एक वैद्यकीय अधिकारी तर दुसऱ्या दिवशी दुसरे वैद्यकीय अधिकारीअशी ड्युटी त्यांनी लावून घेतली आहे.
ज्या नर्स ची रात्रपाळी असते ती नर्स रात्री दवाखान्यात येत नसून घरीच राहत असते ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला २३ गावे लागू असून रात्री बेरात्री प्रसुती साठी महिला पेशंट येत असतात परंतु या ठिकाणी कोणी ही कर्मचारी हजर नसतात त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जावे लागते जर रात्री बेरात्री एखाद्या महिला पेशंट ला त्रास झाला तर पेशंट ने व त्यांच्या जवळ थांबलेल्या महिलांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे या दवाखान्यातअसा प्रकार बऱ्याच दिवसापासून सुरू असून याकडे कोणी लक्ष देणार का? येथे गरीब गरीब लोकांचे जे हाल होत आहे ते थांबणार का? प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवस्थाने बांधण्यात आले असून या निवस्थनात एकही कर्मचारी राहत नसून सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी राहणे अनिवार्य असून सर्व कर्मचारी बाहेरील गावावरून येणे जाणे करीत आहे तरी रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ विजया झोपे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भिमाशंकर जमादार साहेब यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे