महिलांवर अत्याचारच होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे -प्रा.डॉ जे बी अंजने
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपूर,मंडे टू मंडे प्रतिनिधी। ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय आणि श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने, समान संधी केंद्राच्या वतीने जागतिक महिला अत्याचार निवारण दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदी महाविद्यालय भुसावळ येथील प्राचार्य, डॉ. रमेश जोशी सर हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.जे.बी. अंजने होते प्रमुख वक्ते जळगाव येथील सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते श्रीमती वासंती दिघे ह्या होत्या, त्यांनी 'महिला उत्पिडन एंव महिला संरक्षणात्मक कानून' याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना असे म्हटले की, आजच्या परिस्थितीत कायद्यात्मक व्यवस्था प्रस्थापित झाली आहे पण महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, व्यापारी क्षेत्रात केवळ पुरुषांची मक्तेदारी दिसते, या व्यवस्था सकारात्मक बदल घडतांना दिसत आहेत पण या अगोदरच या बदलासाठी अनेक महिला बलिदान दिले व अत्याचार सहन केले हे वास्तव आहे. आज स्वताच्या घरात आणि गर्भात स्त्री सुरक्षित राहीली नाही, त्या विषयी अनेक कायदे केले आहेत, पण त्या अनुषंगाने समाजातील मानसिकता आणि व्यवस्था परिवर्तन होणें अत्यंत आवश्यक आहे. आपण २१ व्या शतकातील नवतरुण आहात आपल्या कडून जग बदलायचे अपेक्षा व्यक्त करतो.... असे म्हणून विद्यार्थ्यांना आव्हान केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य, डॉ. रमेश जोशी सरांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्राचार्य, डॉ. जे. बी. अंजने यांनी आपल्या मनोगतात महिलांवरील होणारे अत्याचार, शोषण व पिळवणूक या विषयी सभेला सजग असे मार्गदर्शन केले. पाहुणे व वक्त्यांचे परिचय प्रा. डॉ. पूनम त्रिवेदी यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विवेक जोशी यांनी केले तर आभार प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी केले तसेच कार्यक्रमाचे तंत्र संचालक म्हणून प्रा. डॉ. संदीप सांळूके यांनी काम पाहिले, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. तर २०० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.