“मंडे टू मंडे इंपॅक्ट” ऐंनपुर येथील जिल्हा परिषद पशू वैद्यकीय दवाखान्यात डॉ ए.जी. डावरे रुजू…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐंनपुर,ता.रावेर, विजय के अवसरमल। ऐंनपुर येथील जिल्हा परिषद पशू वैद्यकीय दवाखान्यात बऱ्याच दिवसापासून डॉक्टर नसल्यामुळे पशुधनाचे हाल होत होते याकडे शासन लक्ष देणार का या आशयाची बातमी दि.१३/०१/२०२० रोजी मंडे टू मंडे ने प्रकाशित केली होती प्रशासनाने या बातमीची दाखल घेवून ऐंनपुर येथील पशू वैद्यकीय दवाखान्यात डॉ ए.जी.डावरे पशुधन विकास अधिकारी यांची नियुक्ती केली.
हा दवाखाना श्रेणी १ चा दवाखाना असून या दवाखान्यात बऱ्याच वर्षा पासुन डॉक्टर नव्हते आमचे प्रतिनिधी यांनी गावातील लोकांच्या समस्या समजून घेत या बाबत मंडे टू मंडे ने वृत्त प्रकाशित केले,या वृत्ताची प्रशासनाने दखल घेत या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी म्हणून डॉ ए.जी.डावरे यांची नियुक्ती केली त्यांनी दि.१०/०२/२०२२ रोजी पदभार स्वीकारला आहे ,या बाबत परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.