ऐनपूर महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव “बौद्धिक संपदा हक्क ” या विषयावर राष्ट्रीय वेबीनार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपूर,ता.रावेर, विजय के अवसरमल। आझादी का अमृत महोत्सव हा भारत सरकारच्या प्रगतीशील भारताच्या 75 वर्षांचा आणि तेथील लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरे करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी एक उपक्रमा अंतर्गत भारत सरकारच्या भारतीय पेटंट आणि ट्रेड मार्क कार्यालय मुंबई, भारत सरकार आणि ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथील ज्ञानस्त्रोत केंद्र (ग्रंथालय) यांच्या संयुक्त विद्यमानाने “बौद्धिक संपदा हक्क” “Awareness on Intellectual Property Rights for the Aspiring Minds”या विषयावर दिनांक ०३ फेब्रुवारी २०२२ रोजी एक दिवसीय राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविक सचिव डॉ. के. जी. कोल्हे यांनी केले त्यात त्यांनी बौद्धिक संपदा हक्क याची प्रासंगिकता तसेच त्याची व्याप्ती या विषयी माहिती देऊन हे वेबीनार सहभागी मान्यवरांना कश्या प्रकारे उपयोगी ठरणार आहे या विषयी सांगितले.
वेबीनार साठी मुख्य वक्ते म्हणून भारतीय पेटंट आणि ट्रेड मार्क कार्यालय मुंबई, भारत सरकार चे श्री. अमोल रवींद्र पाटील हे होते. यांचा परिचय डॉ. एस. एन. वैष्णव यांनी करून दिला. आपल्या व्याखानात श्री. अमोल रवींद्र पाटील यांनी सर्वप्रथम सादरीकरणाच्या पहिल्या सत्रात बौद्धिक संपदे विषयी सर्वसाधारण माहितीचे विवेचन केले. तसेच बौद्धिक संपदाशी निगडीत विविध पैलूवर प्रकाश टाकला. यानंतर सादरीकरणाच्या दुसऱ्या सत्रात पेटंट विषयी मार्गदर्शन केले. यात त्यांनी पेटंट विषयी माहिती देऊन प्रत्यक्ष पेटंट नोंदणी पर्यंतची माहिती दिली. तसेच या संदर्भात असलेले विविध कायदेविषयक तरतुदी व संशोधकाला मिळणाऱ्या विविध संधी या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तराच्या काळात तज्ज्ञांशी हितगुज झाली व त्यांच्या मनात असलेल्या शंका त्यांनी तज्ज्ञांसमोर मांडल्या यावर मार्गदर्शकांनी सखोल असे मार्गदर्शन केले. त्याच बरोबर श्री. संजय खंडारे, निपण अधिकारी, आय. पी. आर. कार्यालय मुंबई, भारत सरकार यांनी सुद्धा कार्यक्रमात मार्दर्शन केले तसेच विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली.
कार्यक्रमात शेवटच्या सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी समारोपप्रसंगी भाषणात “बौद्धिक संपदा हक्क” या विषयाचे वेबीनार आयोजनाबद्दल चे महत्व सांगितले तसेच या संबंधी असलेल्या शिखर संस्था व त्यांचा “बौद्धिक संपदा हक्क” या बद्दल असलेल्या कार्या बद्दल विवेचन केले. तसेच बौध्दिक संपदा हक्क याविषयी विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक यांना जाणिव होण्याची गरज आहे.
या एक दिवसीय राष्ट्रीय सेमीनारला एकूण २७६ सहभागी यांची नोंद झाली. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. एस. एस.साळुंके आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. एस. एन. वैष्णव , तसेच सदस्य डॉ. एस. ए. पाटील प्रा. एच. एम. बाविस्कर, डॉ. जे. पी. नेहेते तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एस. साळुंके यांनी तर तांत्रिक बाजू डॉ. जे. पी. नेहेते यांनी पार पाडली.