ऐनपुर सह परिसरात सट्टा-मटका बिनधास सुरु
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपूर,ता.रावेर,विजय. के. अवसरमल। ऐनपुर येथे गजबजलेला भाग म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या बस स्थानक परिसरात सट्टा-मटका मोठ्या प्रमाणावर सुरू असून याला आशीर्वाद कोणाचा?सट्टा – मटाक्याच्या गोरखं धंदा राज रोसपणे सुरू असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ऐनपूर येथील बसस्थानक परिसरा सह आजूबाजूच्या अनेक गावामध्ये सट्टा मटका सुरू आहे जसे की निंबोल, विटवा, सुलवाडी, कोळदा, धामोडी सह अनेक गावांत सट्टा मटका जोरात सुरु आहे. यामुळे सट्टा मटका कायम स्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी असताना खुले आम सुरू आहे. स्थानिक पोलिसांकडून कुठलीही कारवाई का दिसत नाही,याला कोणाचा आशीर्वाद आहे,सट्टा-मटका अर्थपूर्ण संबंधातून तर सुरू नाहीना? सट्टा-मटका कायम स्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.