रावेर

ऐनपुर येथील तरुणाचा जलसमाधी घेण्याचा इशारा;जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र

मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।

ऐनपूर ता.रावेर (प्रतिनिधी)। ऐनपुर येथील रहिवासी सुरेश माधव कोळी मागणी पूर्ण न झाल्यास यांनी लोकशाहीदिनाचे औचित्य साधुन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना स्वातंत्र्यदीनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की ऐनपूर येथील सुरेश माधव कोळी मौजे ऐनपूर येथील स्थानिक रहिवासी असून त्याच्या आजोबांच्या नावे अपूर्ण राहिलेला भूखंड आदेश मिळणे कामी त्यांनी माननीय जिल्हाधिकारी  यांच्याकडे सन 2012 पासून वारंवार तक्रार अर्ज व कागदपत्रे सादर करून सुद्धा वेळोवेळी त्यांना टाळले जात आहे, त्यांच्या तक्रारीची दखल अद्याप पर्यंत घेतली गेलेले नाही त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे ऐनपूर हे गाव बऱ्याच वर्षापासून पुनर्वसित गाव असून बऱ्याच लोकांचे पुनर्वसन झालेल्या आहे तर काही लोकांचे पुनर्वसन म्हणजेच त्यांच्या नावे अद्यापही भूखंड मिळालेले नाही   सदर अर्जदार हा मजूर असून त्याच्या आजोबांच्या नावे नामे संपत महारु कोळी यांच्या नावे 8000 स्क्वेअर फूट जागा पुनर्वसित भागात मंजूर करण्यात आलेली होती परंतु त्यांना फक्त 2000 स्केअर फुट जागा मिळालेली आहे 2012 पासून वारंवार तक्रार अर्ज करून व पुराव्याची कागदपत्रे सादर करून सुद्धा आजपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही मदत व पुनर्वसन अधिकारी हे हेतु पुरस्कर त्रास देत आहेत त्या त्रासाला कंटाळून नाईलाजास्तव सुरेश माधव कोळी हे भारताच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी ऐनपूर येथे तापी नदी पात्रात जिवंत जलसमाधी घेणार आहे असा इशारा त्यांनी लेखी निवेदन  मा. जिल्हाधिकारी साहेब जळगाव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मा तहसीलदार मॅडम रावेर,  बी. डी.ओ. मॅडम रावेर, सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत ऐनपूर यांना इशारा दिलेला आहे .सदर व्यक्तीचे काही बरेवाईट झाल्यास त्याला जबाबदार हे सर्व अधिकारी असतील असे त्या निवेदनात सुरेश कोळी यांनी नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!