भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

ऐनपुर येथे उपकेंद्रात कोविड 19 चे लसीकरण शिबिर संपन्न ऐनपुर,ता.रावेर(प्रतिनिधी):

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

ऐनपुर,ता.रावेर(प्रतिनिधी)। तालुक्यातील ऐनपुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत वाल्मीकनगर येथील उपकेंद्र येथे प्रा.आ.केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. व्हीं. डी.महाजन व डॉ.संदीप चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड 19 चे लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. सविस्तर वृत्त असे की ऐनपुर प्राथमिक आरोग्य केन्द्र अन्तर्गत आज उपकेंद्र (वाल्मीक नगर) येथे कोविड 19 चे जवळजवळ 250 लस उपलब्ध झाले होते, शिबिरात त्याचा अबाल वृद्ध ,श्रीया ,पुरुष ग्रामस्थ यांनी लाभ घेतला. वैद्यकीय अधिकारी डॉ.व्हि.डी.महाजन व डॉ.संदीप चवरे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सेविका श्रीमती बि.बी.राणे,श्रीमती रोहिणी खलाने, आरोग्य सेवक आर. आर पाटील गतप्रवर्तक रत्नमाला मणुरे, आशा स्वयंसेविकाव आरोग्य कर्मचारी अटेंड्स राहूबाई भालेराव यांनी पार पाडले या लसीकरण शिबिरासाठी सरपंच अमोल महाजन,उपसरपंच,सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी,यांचे सहकार्य लाभले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!