भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

नशिराबाद परिसरात रमजान ईद पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई, १७ गुन्हेगार हद्दपार

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नशिराबाद पोलीस स्टेशनकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

बीएनएसएस कलम १६३  अंतर्गत एकूण १७  प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुसार रेकॉर्डवरील १७  आरोपींना रमजान ईद निमित्त चार दिवसांसाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे.

सणादरम्यान कोणताही गालबोट लागू नये व अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांनी एकोप्याने शांततेत व सुरक्षिततेत रमजान ईद साजरी करावी, सामाजिक सलोखा रहावा हा या कारवाईचा उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तसेच, कोणत्याही अफवांवर व सोशल मीडियावर येणारे आक्षेपार्ह msg वर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!