भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

लाचलुचपत विभागाच्या कारवाईचा अंदाज येताच लाचेची रक्कम घेऊन पोलिस अधिकाऱ्याने ठोकली धुम

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अवैध सावकारी प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन आणि त्यांच्या बाजूने चार्जशीट तयार करण्यासाठी एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याने तब्बल दीड लाखाची लाच मागितली, मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा संशय येताच पोलीस अधिकारी थेट लाचेची रक्कम घेऊन चारचाकी वाहने पसार झाला. ही घटना आकोट शहर पोलीस ठाण्यातील असून अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडलाय. या घटनेने अकोला पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

अवैध सावकारी प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रारदार पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तक्रारदाराच्या पत्नीला तात्काळ अटकपूर्व जामीन आणि आरोपींच्या बाजूनं चार्जशीट तयार करून पाठवावे यासाठी एपीआय राहुल देवकर यांनी तक्रारदाराला तब्बल दीड लाखाची मागणी केली होती. तडजोड़ करून लाचेची रक्कम ही १ लाख २५ हजार रूपयांपर्यत आली.

दरम्यान लाच देणं मान्य नसल्यानं तक्रारदाराने  अमरावतीचे  एसीबी कार्यालय गाठत आपली तक्रार नोंदवली. पडताळणी अंती एपीआय राहुल देवकर यांनी लाचेची मागणी केल्याच सिद्ध झालं आहे. एसीबीच्या सापड्या नुसार आज लाचेची रक्कम देण्या साठी राहुल देवकर यांना अकोट शहरात बोलावण्यात आलं, त्या नुसार लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी राहुल देवकर हे अकोट शहरात दाखल झाले आणि तक्रारदाराकडून लाच स्वीकारली खरी. मात्र एपीआय देवकर यांना एसीबीच्या कारवाईचा संशय आला. त्यानंतर लागलीच त्यांनी लाचेची रक्कम घेत आपल्या खाजगी चारचाकी वाहनानं पळ काढला.

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी राहुल देवकर यांचा दूरपर्यंत पाठलाग केला. परंतू, ते हाती लागले नाहीत. या प्रकरणात अकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अकोला आणि अमरावती एसीबीचे अधिकारी एपीआय राहुल देवकर यांच्या शोधात असून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे,अशी माहिती एसीबीचे अधिकारी मांजरे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!