महाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीय

आताची सर्वात मोठी बातमी : आ. एकनाथराव खडसे भाजप प्रवेश लवकरच !

मुंबई/मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | एकनाथ खडसे लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत, माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती “मंडे टु मंडे न्युज ” ला सूत्रांनी दिली. शनिवारी संध्याकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपची ताकद वाढणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची निश्चित झाले असून दिल्लीमधील नेत्यांच्या गाठीभेटी घेत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दोन दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत प्रवेशाबाबत चर्चा केली असल्याची महिती समोर येत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतत असल्याच्या घडामोडी वेगवान झाल्या आहे.

यावर दिल्ली दरबारी चर्चा सुरू असून, शनिवारी संध्यकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपची ताकद वाढणार आहे. त्यांच्यासोबत आणखी काही जळगाव जिल्ह्यातील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये येण्यासाठी दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या नेत्यांची भेट घेतली व चर्चा केली. त्यांच्या प्रवेशाची वेळ शनिवारी रात्री ठरणार आहे. त्यांच्यासोबत आणखी काही जळगाव जिल्ह्यातील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!